ग्रामीण वार्ताताज्या घडामोडी

दगडपारवा परिसरात गहू ,हरभरा आणि केळी पिकास मोठा फटका

दगडपारवा परिसरात गहू ,हरभरा आणि केळी पिकास मोठा फटका

निलेश इंगळे
दगडपारवा: २८ फेब्रु.२०२४
बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा परिसरामध्ये दि.२६ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री अंदाजे दोन वाजेच्या सुमारास पाऊस व हवा मोठ्या प्रमाणात सुटल्याने दगडपारवा परिसरातील शेतशिवारातील, गहू ज्वारी,हरभरा आणि केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .दगडपारवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रब्बी पीक घेण्यात येते .परंतु दि. २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पाऊस व हवा सुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे ,शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे .

शेतामधील गहू आठ दिवसांमध्ये काढण्यासाठी आला होता. परंतु काल रात्री एकदम हवा आणि पाणी आल्यामुळे ,शेतामधील गहू जमीनदोस्त झालेला आहे .गव्हाचे पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागला आहे .आता तो कुठून निघेल ह्या विवंचनेत शेतकरी आहे.
गणेश महल्ले
शेतकरी,दगडपारवा

शेतामधील पीक काढण्यासाठी रात्री बे रात्री पाणी देण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात फवारणी सुद्धा करण्यात आली होती. परंतु पाण्यामुळे हरभऱ्याचे काढण्याचे दिवस आले असतांना ,अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
मनोहर आडे
शेतकरी,दगडपारवा

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल