अपघात

अनोळखी ईसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आला .

पिंजरच्या संत गाडगेबाबा आपातकालीन पथकाची यशस्वी कामगिरी

ब्रेकिंग कानोसा …..
विहिरीत अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आला .

विहिरीत असलेल्या ईसमाचा मृतदेह ,पिंजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बाहेर काढला
बार्शीटाकळी: दि.०९ ऐप्रील २०२४
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीमची धाडसी कार्यवाही.
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अकोला मलकापूर येवता ते कातखेड रोडला लागुन असलेल्या शेतातील विहिरीत ,एका अनोळखी ईसमाचा मृतदेह तरंगताना असल्याची माहीती बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पिआय शिरीष खंडारे यांना मिळताच ,त्यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहीती देऊन ,सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले .लगेचच दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयूर सळेदार,ऋषिकेश राखोंडे, सार्थक वानखडे,प्रज्वल वानखडे,यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन आपात्कालीन वाहनासह एका तासात घटनास्थळावर पोहचले. लगेच सिन ट्रेस केला असता 30 फुट खोल आणी 15 फुट पाणी असल्याचे दिसून आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून येत होता .अतिशय दुर्गंधी सुटलेली होती .पाऊस चालु असल्यामुळे हा मृतदेह जसाच्या तसा बाहेर काढणे जिगरीचेच काम होते .यावेळी लगेचच सर्च ऑपरेशन चालु केले असता अथक प्रयत्नाने व मोठ्या शिताफीने आज ०९ एप्रिल २०२४ मंगळवार रोजी, सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढला .यावेळी मृतक हा अनोळखी असल्याने त्याचे नाव पता नाव मिळवून आला नसुन पोलीसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आव्हान केले आहे .घटनास्थळावर मदती करीता बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पिआय शिरीष खंडारे ,एसआय विजय इंगळे ,हे.काॅ. नागसेन वानखडे , हे.काॅ. अनिल सांगळे ,
हे.काॅ.मंगेश महाजन ,
पो.काॅ.अनिकेत चव्हाण हे हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.
नागरिकांनी मृतदेहाचीओळख पटल्यास बार्शीटाकळी पोलीसांना कळवावे .

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल