कानोसा
आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

बार्शीटाकळी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेती साहित्याची चोरी करणारा आरोपी जेरबंद

बार्शीटाकळी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेती साहित्याची चोरी करणारा आरोपी जेरबंद
श्याम ठक
बार्शीटाकळी:
येथील पोलीस स्टेशन अंतर्गत शेतातील साहित्याची चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी मोहम्मद नासीर मोहम्मद इस्माईल (वय ४५, रा. अकोलीवेस, बार्शीटाकळी) यांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या शेतातील खोलीची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी ६० किलो उडदाचे ३ कट्टे, एक झटका मशीन, १० किलो क्लच वायर आणि ३ पितळी नोझल असा माल चोरून नेला होता. या तक्रारीवरून बारशिटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
अशी झाली अटक:
तपास अधिकारी ए.एस.आय. फराज शेख यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी अकोला एम.आय.डी.सी. फेज ४ परिसरात आहे. माहिती मिळताच ए.एस.आय. फराज शेख आणि पो.का. अमोल हाके यांनी सापळा रचून रामधन अजाबराव खंडारे (वय ५२, रा. इंदिरा आवास, बार्शीटाकळी) याला ताब्यात घेतले.
मुद्देमाल जप्त:
आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडी (P.C.R.) दरम्यान चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी:
१० किलो क्लच वायर (किंमत ८०० रू.)
२ पितळी नोझल (किंमत १००० रू.)
६० किलो उडदाचे कट्टे (किंमत ५००० रू.)
असा एकूण ६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारशिटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ व त्यांच्या टीमने केली. घटनेचा पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करत आहेत.

Related posts

गांधी रोड हादरला! ‘बिंदी घर’च्या आड महिलांचा छळ; व्हिडिओ ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Investors May Cheer Q2 Earnings, But That isn’t Making The Outlook Better

aadvaith46@gmail.com

In Mozambique, a Living Laboratory for Nature’s Renewal Are On The Way

aadvaith46@gmail.com

Under Armour’s Operating Losses, Sponsorships Raise Red Flags For Analysts

aadvaith46@gmail.com

Grieving Orca Carries Dead Calf for More Than 3 Days: ‘She’s Just Not Letting Go’

aadvaith46@gmail.com

Apple Earnings: Most Boring Quarter of The Year Still Holds Some Intrigue

aadvaith46@gmail.com

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.