पुणे : प्रतिनिधी
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये संक्रांतीमुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. बाजारात गेल्या दोन दिवसांत गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा, रताळी, वाटाणा व हिरव्या मिरचीची उच्चांकी आवक झाली. येथील पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व पालक भाजीची आवक वाढून भावात मोठी घसरण झाली
पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक यांचे दर १० रूपये प्रति जुडी होते. फळभाज्यांमध्ये काकडी च्या दरात वाढ झाली असून इतर भाज्यांचे दर कमी झाले आहेत. हिरवी मिरचीचे भाव वाढले आहेत. कांदा २० – ३० रूपये किलो दराने विक्री केली जात आहे. लसूण १८० – २०० रुपये तर आले ७० – ८० रुपये किलो आहे.
आवक कमी प्रमाणात होत असून मागणी चांगली असल्याने शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांच्या दरात १५ किलो / लिटरच्या डब्यामागे २५ रुपयांनी वाढ झाली. मात्र, मागणीअभावी साखरेतील घसरण सुरूच असून गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे आणखी पन्नास रुपयांनी घट झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे डाळी-कडधान्ये तसेच सर्व अन्नधान्यांचे दर स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, पाम तसेच सूर्यफुल तेलाचे दर वाढले आहेत. यामुळे आयातीची पडतळ वाढल्याने या खाद्यतेलांचे दर वाढले आहेत.
साखरेत आणखी घसरण
बाजारात साखरेची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. मात्र मागणी कमीच आहे. यामुळे गेल्या आठवडयातही साखरेच्या दरात क्विंटलमागे आणखी पन्नास रुपयांनी कमी झाले. संक्रातीच्या काळात मोठया प्रमाणात मागणी असणा-या चिक्की गुळाची आवक जावक गेल्या आठवडयात जवळपास संपली.
डाळी, कडधान्ये स्थिर
अन्नधान्ये आणि डाळी-कडधान्ये बाजारात ग्राहकांची कमतरता जाणवत आहे, यामळे उलाढाल मंदावल्याचे सांगण्यात आले. नव्या तुरीची आवक अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही, यामुळे तुरडाळीचे दर तेजीतच आहेत. मात्र मागणी कमी असल्याने हरभराडाळीतील मंदी कायम आहे. अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते.
