आरोग्य विभागउत्सवविशेषसत्कारमूर्तीसामाजिक

अभावातून स्वंयसिध्दा बनलेल्या कु.दिपाली रिसोडकर ह्या युवतीचा सत्कार

बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात पीसीपीएनडीटी कायद्याबद्दल मार्गदर्शन

बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात पीसीपीएनडीटी कायद्याबद्दल मार्गदर्शन
अभावातून स्वंयसिध्दा बनलेल्या कु.दिपाली रिसोडकर ह्या युवतीचा सत्कार
ग्रामीण रुग्णालय अधिक्षिका यांचा स्तुत्य उपक्रम
बार्शीटाकळी:
आज दि.१४  ऑक्टो. २०२४ रोजी पी सी पी एन डी टी ॲक्ट अंतर्गत गर्भलिंग निदान  कायद्याची अंमलबजावणी व जनजागृती  करिता  जिल्हा शल्चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे मॅडम  आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली ,ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात  ग्रामीण रुग्णालयाच्या  वैद्यकीय अधीक्षिका  डॉ. श्वेता वानखडे यांनी उपस्थितांना पीसीपीएनडीटी ॲक्ट बद्दल मार्गदर्शन केले. जर कुणी गर्भलिंग निदान करत असेल त्याबद्दल शासनाला माहिती देणाऱ्यास एक लक्ष रुपये दिल्या जाईल व गर्भलिंग निदान करणाऱ्यास कठोर शिक्षा होईल याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये वडीलाचा मृत्यू झाल्यानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर  मात करत ,घरचा सर्व व्याप सांभाळून आपले शिक्षण पुर्ण करून नोकरी करत असलेल्या कु.दीपाली रिसोडकर हिचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाला महिला पुरुष तसेच रुग्णालयाचे कर्मचारी श्रीमती पवनिकर,श्रीमती रहाणे, श्रीमती आठवले, श्रीमती शर्मा, श्रीमती माने,राम बायस्कर,अरविंद पारस्कर,मोहन लोणकर व अनिल ठाकरे यांच्यासह बहुसंख्येने  नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक प्रभाकर तिडके यांनी केले तर आभारप्रदर्शन राम बायस्कर यांनी केले. वैद्यकीय अधिक्षिका डॉ.श्वेता वानखडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल