महाराष्ट्रविशेषस्वच्छता अभीयान

ईवल्या ईवल्या हातांनी केली साफसफाई

बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालय परिसर स्वच्छ केला

ईवल्या ईवल्या हातांनी केली साफसफाई

http://https://youtu.be/QN2HYat46tQ?si=n93tuY6IQ6VHGEdl

द ग्रेट मराठा गृप बार्शीटाकळीचा स्तुत्य उपक्रम

गृपचे संस्थापक अध्यक्ष नरेश रत्नपारखी चालवतात निशुल्क शिकवणी वर्ग ..

श्याम ठक
बार्शीटाकळी:
शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील साफसफाई करून बार्शीटाकळीच्या द ग्रेट मराठा गृपची अतुलनीय कामगिरी.
सविस्तर वृत्त असे की नुकतीच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती व वऱ्हाडी बोलीभाषा दिवस संपन्न झाला. जिकडे तिकडे ह्यादिवशी स्वच्छता मोहीम व गाडगेबाबा ह्या विषयांवर व्याख्याने झाली. कुणी झाडु हाती घेऊन परिसर साफ करुन समाजापुढे स्वच्छता किती महत्वाची आहे याचे उदाहरण ठेवले. त्याचप्रमाणे बार्शीटाकळी येथील द ग्रेट मराठा गृप हा देखील सातत्याने समाजोपयोगी नवनवीन उपक्रम हाती घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून गृपने बार्शीटाकळी तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा भार उचलणाऱ्या ,शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसराचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून रुग्णालय परिसराची साफसफाई करण्यासाठी पुढे आले. आज दि.०१ मार्च २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान नरेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली द ग्रेट मराठा मंडळ बार्शीटाकळीच्या बाल गोपाल,बालीका ,युवक /युवती यांनी हाती झाडू घेऊन अवघा परिसर स्वच्छ करून समाजासमोर स्वच्छतेचे महत्त्व आपल्या कृतीतून दाखवून दिले. ह्या मोहिमेत सहभागी झालेल्यांचे वय ९ वर्षापासून ते २० -२२ वर्षापर्यंत होते. त्यांच्या हा कामगीरीसाठी त्यांच्यावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल