उत्सवमहाराष्ट्र

वाघा (गड) येथे शिवजयंती साजरी 

वाघा (गड) येथे शिवजयंती साजरी 

बार्शीटाकळी:२१ फेब्रुवारी
तालुक्यातील वाघा( गड )गावात दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात वाघा( गड ) येथे साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. निश्चयाचा महामेरू ,बहुत जनांसी आधारु ,अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी यांच्या नावाचा जयजयकार करत व्याख्याते प्रवीण अनिल राऊत यांनी पुढील व्याख्यानाला सुरुवात केली. व्याख्यानातून सर्वांच्या मनांत ऊर्जा निर्माण केली.
यावेळी गावातील सर्व शिवभक्त मंडळी यांची उपस्थिती लाभली .आयोजक शिवशक्ती मंडळ वाघा (गड ) अध्यक्ष रामेश्वर लोणकर व समस्त गावकरी मंडळी यांच्या मोलाच्या सहकार्याने जयंती साजरी करण्यात आली .

शिवचरित्र आम्हाला जगण्याची प्रेरणा देते. स्वबळाचा विधायक वापर केल्यास स्वकल्याणासह समाजाचे सुद्धा हित जोपासल्या जाऊ शकते. शिवाजी महाराज यांची जयंती वर्षातून एकदा न साजरी होता ती दररोज व घरोघरी साजरी झाली पाहिजे. तेव्हा कुठे येणाऱ्या पीढीला शिवाजी महाराजांच्या विचाऱावर चालण्याचे बाळकडू मिळेल.
मंगेश  कळमकर
वाघा (गड )

Advt

http://https://youtu.be/6oYs6-WvrwM?si=PL-mwjxQrxIV8-zn

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल