उत्सव

४६ तांड्यांसह बंजारा वस्तीत साजरा होणार २८५ वा जन्मोत्सव

"घडी घडी हाक तोनं मारू सेवालालजी!”

४६ तांड्यांसह बंजारा वस्तीत साजरा होणार २८५ वा जन्मोत्सव

“घडी घडी हाक तोनं मारू सेवालालजी!”
श्याम ठक
बार्शीटाकळी : आपल्या व्यापाराची
व्याप्ती वाढविण्यासाठी २२ प्रांतांत भ्रमण करणारे व गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी धावून येणारे जगद्‌गुरू संत सेवालाल महाराज यांचा २८५ वा जन्मोत्सव सोहळा गुरुवारी बार्शीटाकळी तालुक्यातील ४६ तांड्यांसह गावांमध्ये बंजारा वस्तीत साजरा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
१५ फेब्रुवारी १७३९ मध्ये सुवर्ण खोपा (ता. गुती बेलारी, जि. आनंदपूर) येथे जन्मलेल्या संत सेवालाल
महाराजांनी वयाच्या अवघ्या ११ वर्षांच्या काळात गाई, बैल, गुरेढोरे चारण्याचा व्यवसाय हाती घेतला होता. त्यांचे वडील भीमा नाईक रामावत यांचा वारसा पुढे चालविण्याच्या हेतूने त्यांनी हे पाऊल उचलले.
त्यांच्याकडे ३७५५ गाई व ५६० बैल होते. व्यापाराची व्याप्ती वाढवत त्यांनी बंजारा समाजाच्या उत्थानासाठी व परिवर्तनासाठी संघर्ष करून समाजात बदल घडविण्याचे प्रयत्न केल्याचा ग्रंथात उल्लेख आढळतो. संत सेवालाल महाराजांच्या घराण्याचा
वारसा लाभलेले कवडीपूर (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील सवाईराम महाराज यांनी संत सेवालाल महाराजांचे जीवनचरित्र रेखाटले. बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगडचे काळुसिंग महाराज रामावत यांनी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्वप्रथम २००३ पासून परंपरा सुरू केली व पाहता-पाहता आता तालुक्यात असलेल्या बंजारा वस्तीत व तांड्या- कीर्तन,
तांड्यांमध्ये भजन, ग्रामस्वच्छता, हजारो पणत्यांची आरास, महाप्रसाद, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आदींसह अनेक उपक्रम राबवून सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.
लोहगड येथे हजारो बंजारा बांधव होणार सोहळ्याचे साक्षीदार
राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत लोहगड येथे हजारोंच्या संख्येने बंजारा समाजबांधव एकत्रित येऊन या सोहळ्याचे साक्षीदार होतात.

हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो, संत सेवालाल महाराजांच्या संपूर्ण चरित्र ग्रंथातील अनुवादन करून मराठी व बंजारा भाषेत या ग्रंथाच्या प्रती प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचे लेखन रामराव महाराज (धाबा) यांनी केले.

जगतगुरु संत सेवालाल
महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधून जयपूर (राजस्थान) येथून महाराजांची मूर्ती तालुक्यात आणण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी वरखेड येथे मोठ्या उत्साहात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तांड्या-तांड्यामध्ये होणाऱ्या संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे बंजारा बांधवांनी साक्षीदार व्हावे.
– काळूसिंग महाराज, लोहगड

बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव भजन, कीर्तनाद्वारे साजरा करून जनजागृती करावी.
– रामचंद्र महाराज, धाबा

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल