उत्सवविशेष

बार्शीटाकळी येथे माता रमाई जयंती साजरी

भिम वाटीका प्रेरणा संघाच्या वतीने आयोजन

बार्शीटाकळी येथे माता रमाई जयंती साजरी

भिम वाटीका प्रेरणा संघाच्या वतीने आयोजन
बार्शीटाकळी:
स्थानिक भिम वाटीका (पंचायत समिती) बार्शीटाकळी येथे माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली .
भारतीय घटनेचे शिल्पकार तथा कोटी कोटी वंचितांचे भाग्यविधाते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन ,भीमवाटीका प्रेरणा संघ बार्शीटाकळी आयोजन केले होते.यावेळी मा. नगरसेवक तथा गटनेता सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांचे हस्ते ,माता रमाई यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शांतारामजी वानखडे गुरुजी यांनी माता रमाई यांचे जिवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन भिम वाटीका प्रेरणा संघचे अध्यक्ष आर.के. जामनीक यांनी तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी दादारावजी जामनीक यांनी पार पाडली. ह्या जयंती सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने माजी स्टेशन मास्तर एम. डी. बनसोडे.. मनवर ठेकेदार .. राजु जाधव.. झामरे भाऊ ,श्रीकृष्ण सरदार व जितु बनसोड यांचा समावेश होता.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल