ताज्या घडामोडीनिवडणूक विभागराजकीय

राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे

राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे

निवडणूक आयोगाचा निर्णय

बार्शीटाकळी: ०६ फेब्रुवारी

अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे.शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे.

चौकट
अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्ही आतिशय आनंदी आहोत. निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय देत भारतीय लोकशाही सिध्दातांवर शिक्कामोर्तब केलं आहे. याचे अंत:करणापासून स्वागत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठरवलेली ध्येय धोरणे ठरवून आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्यात अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली आपली भूमिका योग्य पध्दतीने बजावेल आणि राज्यातील जनतेचा फार मोठा पाठिंबा पाठबळ आम्हाला मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे असं म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आमदार अपात्रतेचा निकाल लागणार

आमदार अपात्रता निकाल १४ फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली असल्याची माहिती साम टिव्हीला सूत्रांनी दिली आहे. अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य लवकरच ठरणार आहे. शिवसेना निकालाहुन वेगळा आणि मोठा निर्णय येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

(सौजन्य : सकाळ डिजिटल)

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल