क्रीडा व मनोरंजनविशेषशैक्षणिक

श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यानी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद महेंद्र महाजन रिसोड : श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल यावेळी धारतीर्थ लोणार व हिवरा आश्रम येथे गेली. सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट दिली.विवेकानंद आश्रम शुकदास महाराजांसाठी ओळखला जातो. परंतु महाराजांचे निधन झाले तरीही येथील व्यवस्था महाराजांच्या शिस्ती प्रमाणेच दिसून येते.शुकदास महाराजांनी १४ जानेवारी १९६५ रोजी मेहकर ते चिखली महामार्गावर हिवरा आश्रम गावी या विवेकानंद आश्रमची लोकसेवेसाठी स्थापना केली.विवेकानंद आश्रमाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा अशीही या आश्रमाची ओळख आहे. दीड हजार व्यक्तींना एकाचवेळी ध्यान करता येईल असा ध्यानमंडप येथे आहे. सहा एकर परिसरात स्वामी विवेकानंद स्मारक उभारले जात आहे. अवघ्या २० मिनिटांत अडीच ते तीन लाख जणांना भोजन देण्याचे कसब या आश्रमाची आणखी एक ओळख. यासाठी १ हजार १०० स्वयंसेवक, १०१ ट्रॅक्टर्स दिमतीला असतात. या विवेकानंद आश्रमात विविध संमेलने झाली आहेत. विवेकानंद ज्ञानपीठ, विवेकानंद अपंग मुलामुलींचे निवासी विद्यालय, विवेकानंद कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय कृषी महाविद्यालय येथे आहे.विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहिती घेऊन त्यांच्या कार्याला वंदन केले. श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम आपल्या स्तरावर आयोजित करत असते. सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच निसर्गाची आवड म्हणून तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नवनवीन क्षेत्राला भेटी देण्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले. या शैक्षणिक सहलीसाठी वर्ग 3 ते 7 चे विद्यार्थी सहभागी होते. सहल जाणार याच भावनेने सर्वांच्या मनात हर्ष दिसून आला. तसेच सर्वांनी उत्साहाने विवेकानंद स्मारक ला भेट देऊन बोटिंग चा आनंद घेतला. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आनंदी राहावी यासाठी या सहलीचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी वन भोजन करून, विविध खेळ खेळून या सहलीचा आनंद लुटला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

महेंद्र महाजन ,तालुका प्रतिनिधी रिसोड

श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यानी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद

महेंद्र महाजन

रिसोड : श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल यावेळी धारतीर्थ लोणार व हिवरा आश्रम येथे गेली. सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट दिली.विवेकानंद आश्रम शुकदास महाराजांसाठी ओळखला जातो. परंतु महाराजांचे निधन झाले तरीही येथील व्यवस्था महाराजांच्या शिस्ती प्रमाणेच दिसून येते.शुकदास महाराजांनी १४ जानेवारी १९६५ रोजी मेहकर ते चिखली महामार्गावर हिवरा आश्रम गावी या विवेकानंद आश्रमची लोकसेवेसाठी स्थापना केली.विवेकानंद आश्रमाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा अशीही या आश्रमाची ओळख आहे. दीड हजार व्यक्तींना एकाचवेळी ध्यान करता येईल असा ध्यानमंडप येथे आहे. सहा एकर परिसरात स्वामी विवेकानंद स्मारक उभारले जात आहे. अवघ्या २० मिनिटांत अडीच ते तीन लाख जणांना भोजन देण्याचे कसब या आश्रमाची आणखी एक ओळख. यासाठी १ हजार १०० स्वयंसेवक, १०१ ट्रॅक्टर्स दिमतीला असतात. या विवेकानंद आश्रमात विविध संमेलने झाली आहेत. विवेकानंद ज्ञानपीठ, विवेकानंद अपंग मुलामुलींचे निवासी विद्यालय, विवेकानंद कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय कृषी महाविद्यालय येथे आहे.विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहिती घेऊन त्यांच्या कार्याला वंदन केले. श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम आपल्या स्तरावर आयोजित करत असते. सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच निसर्गाची आवड म्हणून तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नवनवीन क्षेत्राला भेटी देण्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले. या शैक्षणिक सहलीसाठी वर्ग 3 ते 7 चे विद्यार्थी सहभागी होते. सहल जाणार याच भावनेने सर्वांच्या मनात हर्ष दिसून आला. तसेच सर्वांनी उत्साहाने विवेकानंद स्मारक ला भेट देऊन बोटिंग चा आनंद घेतला. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आनंदी राहावी यासाठी या सहलीचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी वन भोजन करून, विविध खेळ खेळून या सहलीचा आनंद लुटला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल