अपघात

व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत बॅंक व्यवस्थापकाची आत्महत्या

महेंद्र महाजन ,रिसोड तालुका प्रतिनिधी

 

व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत बॅंक व्यवस्थापकाची आत्महत्या

तलाठी भरती मध्ये फसवणूक झाल्यामुळे बँक व्यवस्थापकाने केली आत्महत्या

महेंद्र महाजन
रिसोड तालुका प्रतिनिधी

रिसोड:दि.०१ फेब्रुवारी २०२४
‘‘मित्रा माझी लाइफ खूप छान होती रे, माझ्या हत्येचे कारण तूच… असे स्टेटस व्हॉट्स ॲपवर ठेवत ॲक्सिस बॅंकेच्या सहायक व्यवस्थापकाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
सविस्तर वृत्त असे की
विठ्ठल मधुकर सदार (वय २८, मूळ रा. खडकी सदार, रिसोड, वाशीम) असे या तरुणाचे नाव आहे. औरंगपुरा गुलमंडी या भागात हा प्रकार ३१ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आला. दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलच्या माध्यमातून पुण्याच्या एका व्यक्तीने तलाठी भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची रक्कम घेतली होती. या प्रकारात त्याची फसवणूक झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. याप्रकरणी सिटी चौक पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल हा आठ वर्षांपासून छत्रपती संभाजी नगरात वास्तव्यास होता. धनमंडी, नारळीबाग भागात तो चार मित्रांसह एका फ्लॅटमध्ये राहत होता. ॲक्सिस बँकेत काम करीत असतानाच विठ्ठल स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील करीत होता. ३१ जानेवारीला ,विठ्ठलने मोबाइल व्हॉट्सॲपवर भावनिक स्टेटस सर्वांना सोडून जात असल्याचा उल्लेख केला. त्याच्या मित्रांनी हे स्टेटस पाहताच फ्लॅटकडे धाव घेतली. यावेळी फ्लॅटमध्ये एकट्या असलेल्या विठ्ठलने गळफास घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. मित्रांनी तातडीने सिटी चौक पोलिसांना ही माहिती दिली. विठ्ठलचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी खडकी सदार येथे अंत्यविधीसाठी रवाना करण्यात आला.
विठ्ठल हा मागील काही दिवसांपासून तणावात होता. बुधवारी सकाळी त्याने रूममेटला आपण विठ्ठलाची मूर्ती आणून घेऊ, आपल्यावर संकटं सुरू आहेत. विठ्ठल आपल्यावरील संकट दूर करेल, असा आशावाद त्याने मित्रासोबत व्यक्त केला होता. यानंतर मित्र बाहेर गेल्यानंतर त्याने काही वेळात गळफास घेतला. त्यापूर्वी त्याने आपला मोबाइल फोन फॉरमॅट केला. सिम तोडून टाकले. तसेच मोबाइल देखील फोडून टाकला असल्याची माहिती मित्रांनी दिली.

काय आहे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये?

‘‘मित्रा माझी लाइफ खूप छान चालू होती रे… तू जो माझ्यासोबत दगाफटका केला ना, फक्त माझाच नाही तर एका बापाचा आणि एका आईचा आधार घेऊन चालला, मी तर चाललो सोडून. कारण तू जे केलंस, त्याचं एवढं मोठं ओझं नाही झेलू शकत मित्रा. माझ्यासोबत केलं ना तू, ते फक्त दुसऱ्यासोबत नको करू, माझी हत्या हीच तुझी पनिशमेंट, माझ्या हत्येचं कारण तूच. तुझं नाव तर नाही घेत मित्रा, फक्त माझ्यासारखं फसवू नको कोणाला, तुला हात जोडून सांगतो मित्रा… शक्य झाले तर भाऊ आणि आई-बाबाला सांभाळ. असं अर्ध्यावर सोडून चाललो मी तुम्हाला आणि एका व्यक्तीला पण.’’

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल