अपघात

वाघागड जवळ ,महान धरण परिसरात आढळला महिलेचा मृतदेह

ओळख पटविण्याचे पिंजर पोलीसांचे आवाहन

..

वाघागड जवळ ,महान धरण परिसरात आढळला महिलेचा मृतदेह

ओळख पटविण्यासाठी पिंजर पोलीसांनी केले आवाहन
बार्शीटाकळी:
तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील महान धरणा जवळ,वाघागड परिसरात , एका अनोळखी महिलेचे प्रेत तरंगत असताना मिळून आले आहे . सदर महिलेचे वर्णन खालील प्रमाणे –
वयोगट अंदाजे ४५ ते ५० वर्षे,
अंगात निळ्या रंगाची व लाल काठ पदराची साडी, निळ्या रंगाचे ब्लाऊज, हातात हिरव्या रंगाच्या प्लास्टीक बांगड्या, गळ्यात पिवळ्या मण्याचे मंगळसूत्र, पायात जोडवे नसलेली, काळया रंगाची स्लीपर चप्पल,सोबत शहाणे ज्वेलर्स मानोरा असे लिहीलेली पाऊच व काही पैसे .वरील वर्णनाची महिला आपलेकडे मिसिंग असल्यास पो.स्टे. पिंजर जि. अकोला येथे संपर्क करावा . असे सपोनि राहुल वाघ ठाणेदार
पो .स्टे. पिंजर (9850411528) यांनी आवाहन केले आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल