अपघात

ट्रकच्या धडकेने रस्त्याच्या बाजूला उभे असलेले विष्णु गुजर ठार

  • ट्रकच्या धडकेने रस्त्याच्या बाजूला उभे असलेले विष्णु गुजर ठार

हिट ॲन्ड रनचा प्रकार .. चालका विरूध्द पोलीसात तक्रार दाखल
अकोला:
बोरगांव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवळी फाट्यावर एका ईसमास धडक देवून ,ट्रक चालक फरार .. जखमी ईसमाचा मृत्यू,बोरगांव मंजू पोलीसात तक्रार दाखल . हकीकत अशी की
संपूर्ण देशात हिट & रन ह्या कायद्या विरोधातील वारे वाहत असतांनाच दि.३० डिसेंबर २०२३ रोजी ,दुपारी एक वाजताच्या सुमारास ,देवळी येथील चेतन विष्णु गुजर व विष्णु डिगांबर गुजर हे बापलेक एम एच ३० बीएम ०४३१ क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलने देवळी फाट्यावर आले .. मयत विष्णु गुजर हे देवळी फाट्यावर अकोला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत ,रस्त्याच्या बाजुला फोनवर बोलत उभे होते. तेवढ्यात वणी रंभापुर कडून ट्रक क्रमांक एम एच 30 एल् 0985 भरधाव वेगाने येत होता. त्या ट्रकने मयत विष्णु गुजर यांना धडक दिल्याने ते व मोटारसायकल दुर जाऊन पडले .. चेतन थोडा बाजुला असल्यामुळे सुदैवाने त्याला काही झाले नाही. परंतु दुर्दैवाने विष्णु यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ,मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून ते जागीच गतप्राण झाले. धडक देणाऱ्या ट्रकचा चालक थोड्या अंतरावर ट्रक उभा करून पळुन गेला .. सदर घटनेची फिर्याद मृतकाचा मुलगा चेतन याने बोरगांव मंजू पोलीस स्टेशनला दिली असता .. पोलीसांनी त्या ट्रक चालका विरूध्द भांदवि नुसार २७९,३०४- A,१३४ & १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.. पुढील तपास बोरगांव मंजु पोलीस करत असल्याचे समजते.

 

 

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल