उत्सवक्रीडा व मनोरंजनजिल्हा

बार्शीटाकळी तालुक्याला ,जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात द्वितीय पारितोषिक

बार्शीटाकळी तालुक्याला ,सांस्कृतिक कार्यक्रमात द्वितीय पारितोषिक

बार्शीटाकळी:

अकोला जिल्हा परिषद मार्फत
सुरु असलेल्या ,जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव 2023 – 24  ,6 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत  वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये
बार्शीटाकळी तालुक्यातील स्पर्धकांनी ,सामूहिक नृत्य प्रकार स्पर्धेत, राजस्थानी नृत्यात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील गटविकास अधिकारी कालिदास तापी , अधीक्षक दिलीप शिरसाट , क्रीडा स्पर्धा समन्वयक जंजाळ ,रिजवान, अनिता भगत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली सामूहिक नृत्य स्पर्धा पार पडुन , बार्शीटाकळी तालुक्याला सर्वाधिक गुणांक मिळुन,  बार्शीटाकळी  तालुक्याने सामूहिक   नृत्य  स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला . सामूहिक नृत्यात अनिता भगत, अंतकला वानखडे, नेहा, शितल तेलगोटे ,बबीता मॅडम, संगीता जाधव ,सुषमा मॅडम,लीना फुंडकर आदी सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित येऊन सामूहिक नृत्य स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला   . मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या हस्ते त्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

जाहिरात…

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल