महाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

यवतमाळ जिल्ह्यातील पिक विमा कंपनीवर कठोर कारवाईची मनसे शेतकरी सेनेची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील पिक विमा कंपनीवर कठोर कारवाईची मनसे शेतकरी सेनेची मागणी

अभिजीत नानवटकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)

यवतमाळ

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पिक विमा कंपनीवर कठोर कारवाई कारवाई करा पिक विमा कंपनीकडून शेतातील नुकसानभरपाईचे पंचनामे व सर्व्हे कागदोपत्री घोडे नाचून केलेले आहे त्यामुळे बरेच शेतकरी मदतीपासून वंचित आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या हेतूने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाते. चालू वर्षापासून तर अवघ्या एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली. या योजनेत अधिसूचित पिकांना पेरणीपासून पिकांच्या काढणीपश्चातही विमासंरक्षण आहे. खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट नोंद झाली आहे. मात्र संबंधित विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप विमेची रक्कम देण्यात आली नाही. खरीप हंगामात झालेल्या पूर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र संबंधित विमा कंपनीकडून अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही. अनेक गावात तर कंपनीकडून पंचनामे व सर्व्हेक्षण कागदी घोडे नाचून करण्यात आले.1 रुपये शेतकऱ्याने भरावे त्याचे प्रीमियम हे राज्य सरकार कडून भरण्यात आले. त्यापोटी विमा कंपनीला राज्य सरकारने 5 अब्ज 9 कोटी 11 लाख 18 हजार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भरले. 5 लाख 25 हजार 541 शेतकऱ्यांपैकी 59 हजार शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे. ही मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे‌, प्रत्यक्षात शेतशिवारात खत, बियाणे, औषधी आणि इतर खर्च हजारांपेक्षा अधिक आहे. असे असतानाही कंपनीने दोन ते शंभर रुपयांची नुकसान भरपाई देताना नेमके निकष काय वापरले याचे संशोधन आपण करावे व जनतेला पण कळवावे की असे कसे झालेले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पिक विमा मिळालेल्या लाभांमध्ये कमालीची तफावत आहे या तपावतीला जबाबदार कोण आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. काही शेतकऱ्यांना अगदी 55 रुपये तर काही शेतकऱ्यांना लाखाच्या घरात लाभ मिळाला आहे. हा प्रकार चिरीमिरी देऊन तर नाही घडलेला आहे याची सखोल चौकशी आपण करावी. जवळजवळ दीड लाख शेतकऱ्यांना अत्यल्प म्हणजे हजार रुपयापेक्षा कमी परतावा मिळाला आहे.
2 रूपये ते 100 रुपये – 6,175
101 रूपये ते 500 रूपये – 43,533
501 रूपये ते 1000 रुपये – 77,872

घाटंजी तालुक्यातील शिवनी गावचे दिलीप राठोड यांना 55 रुपये 99 पैसे माळाले. असेच 100 रूपये ते 1000 रूपये मिळणारे शेतकरी शेकडो आहे. याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील जवळजवळ पाच शेतकऱ्यांना लाखाच्यावर विमा मिळाला आहे, झरीजामणी तालुक्यातील, चंद्रप्रकाश छाछड 5,60,648/- रूपये, कळंब तालुक्यातील किशोर यादव रुईकर 4,26,077/- रूपये, गोविंद गणपत रुईकर 3,76,576/- रूपये, नारायण गणपत रुईकर 3,27,570/- रूपये, वसंत वामन सराटे 3,12,906/- रूपये. यांना मिळाले ज्यांना लाखाच्यावर पिक विमा दिला त्याबद्दल अभिनंदन पण त्याच मौजा मधील त्याच तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना काही ओवाळणी पुरते फक्त पैसे दिले आहे याची सखोल चौकशी करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईलने आंदोलन केल्या जाईल.

 यवतमाळ जिल्ह्यात पिक विमा कंपनी च्या सर्व तालुक्यातील ऑफिसचा पत्ता व संपर्क क्रमांक असलेला एक मोठा बोर्ड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालया लावावा.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहेमान, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजाननभाऊ पोटे, सादिक शेख मनसे तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अभिजीतभाऊ नानवटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल