क्रीडा व मनोरंजनदेश विदेशविशेष

अखेर भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त

नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णयही रद्द करण्यात आले आहेत.

 

अखेर भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त

नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णयही रद्द करण्यात आले आहेत.

बार्शीटाकळी:

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर केलेल्या आरोपानंतरही त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या संजय कुमार सिंह हे WFI चे अध्यक्ष बनले. मात्र याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी कुस्ती सोडत असल्याचं जाहीर केलं. बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार कर्तव्य पथावर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठेवला.

कुस्ती महासंघाच्या घटनेनुसार स्पर्धेचं आयोजन झालं नसल्याचं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे. याबाबत आता पुढील आदेश येईपर्यंत कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. संजय सिंह यांचा भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर तेच अध्यक्ष होणार हे निश्चित झालं. तेव्हापासून त्यांच्या नियुक्तीला पैलवानांनी विरोध केला होता. संजय सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय असून ते अध्यक्ष झाल्यात कुस्ती महासंघात सुधारणांची अपेक्षा दिसत नाही. आता कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तर संजय सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे.

कारवाईचे कारण स्पर्धेच्या आयोजनात घाई
क्रीडा मंत्रालयाने निवेदनात म्हटलं की, कुस्ती महासंघाने नियम आणि कायद्यांना बाजूला सारून ही प्रक्रिया पूर्ण केली. राष्ट्रीय कुस्ती स्पर्दा आयोजित करण्यात घाई केल्याचा आणि नियमांचे पालन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजन उत्तर प्रदेशातील गोंडा इथं होणार होते.

सौजन्य: न्यूजहंट

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल